सांगली : सराफांना गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंद

एलसीबीची कारवाई : पत्नीलाही अटक; आटपाडी, सांगलीच्या सराफांची सहा कोटींची फसवणूक
Jerband, the main mastermind who framed Rafa
राफांना गंडा घालणारा मुख्य सूत्रधार जेरबंदFile Photo
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली, आटपाडीमधील दोन सराफांना सहा कोटी रुपयांचा गंडा घालणार्‍या बंगाली कारागिराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. गौतम गोपाल दास (वय 43, रा. गोपालनगर, दक्षिणपाडा, कोलाघाट, मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. त्याला ओडिशामधील जगन्नाथ पुरी येथून ताब्यात घेण्यात आले. याच गुन्ह्यात त्याची पत्नी रुमा गौतम दास (37) ही सांगलीतील विश्रामबाग परिसरात मिळून आली. या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

Jerband, the main mastermind who framed Rafa
सांगली : सराफांना गंडा घालणार्‍या दोघांना बेड्या

आटपाडी येथील गौतम दास व सौरभ दास या बंगाली कारागिरांनी 25 वर्षांपासून सराफांचा विश्वास संपादन केला होता. आटपाडीसह सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सराफांकडून चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा त्यांचा व्यवसाय होता. आटपाडी येथील सराफाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे साडेतीन हजार तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सांगलीतील सराफ महेश्वर जवळे यांनी, बंगाली कारागिरांनी त्यांची पावणेचार कोटींची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली होती. आटपाडीतील तक्रारीनंतर एलसीबीच्या पथकाने बंगाली कारागिरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. त्यातील स्वरूप दास व विश्वनाथ दास या दोघांना आठवड्यापूर्वी पश्चिम बंगालमधून अटक केली होती; पण मुख्य संशयित गौतम दास व त्याची पत्नी रूमा पसार होते.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मुख्य सूत्रधार गौतम दास याच्या शोधासाठी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले. पथकाने मुख्य संशयिताचा पश्चिम बंगालमध्ये शोध घेतला. संशयित लपण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेऊन गौतमचा शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. गौतम हा वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्यामुळे पथकाने परराज्यात खबरे तयार केले. तसेच तांत्रिक तपास केला. यावेळी गौतम हा ओडिशामधील जगन्नाथ पुरी येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन गौतमला ताब्यात घेतले. पुरी येथील जिल्हा न्यायालयात त्याला हजर करून ट्रान्झिट रिमांड घेतला. त्यानंतर मुख्य सूत्रधार गौतम दाससह एलसीबीचे पथक सांगलीत दाखल झाले. गौतम याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Jerband, the main mastermind who framed Rafa
fraud : तरुणाचा ठग्ज् ऑफ ‘फोन पे’ फंडा; सराफांना घातला लाखोंचा गंडा

पत्नीवरही गुन्हा दाखल

सांगलीतील सराफांच्या फसवणूकप्रकरणी गौतमची पत्नी रुमा दास हिच्यावरही गुन्हा दाखल केला होता. ती विश्रामबाग परिसरात आढळली. तिला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news