Sangli gas agencies inspection: सांगली, मिरज, जतमधील गॅस एजन्सींची तपासणी

गॅस होणार घरपोहोच; एजन्सीसमोर गर्दी न करण्याचे आवाहन
Sangli gas agencies inspection: सांगली, मिरज, जतमधील गॅस एजन्सींची तपासणी
Published on
Updated on

सांगली : घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी नियुक्त जिल्हा स्तरावरील दक्षता व फिरत्या पथकांनी तपासणीचा वेग वाढवला असून, काल सांगली, मिरज, उरूण ईश्वरपूर, जतसह अनेक ठिकाणी गॅस एजन्सीची तपासणी करण्यात आली.

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष फुलूके यांनी सांगितले की, जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर वितरण आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची नियमित तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एचपीसीएल कंपनीचा 1713 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 94.9 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा 58 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 1195.6 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.

ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरित करण्यात येत आहे. काल शहरातील स्वाती, खेराडकर आदी गॅस एजन्सींची तपासणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news