Pudhari shopping festival: दै. पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला तुफान गर्दी

ईश्वरपूर येथील कार्यक्रमास अध्यक्षा स्मितादेवी जाधव यांची भेट
Pudhari shopping festival: दै. पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला तुफान गर्दी
Published on
Updated on

ईश्वरपूर : येथील जयंत पाटील खुले नाट्यगृहात आयोजित दै. पुढारीच्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल ईश्वरपूरला रविवारी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव यांनी फेस्टिव्हलला भेट देऊन स्टॉल धारकांशी संवाद साधला. सुटी असल्याने नागरिकांनी खरेदी, खवय्येगिरीबरोबरच मनोरंजनाचाही आनंद लुटला. फॅशन शो ने कार्यक्रमाची रंगत वाढवली. मिस -मिसेस कस्तुरी ईश्वरपूर 2026 स्पर्धा उशिरापर्यंत सुरू होती.

दै. पुढारी आणि प्रतिराज युवाशक्तीच्यावतीने फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. उरूण ईश्वरपूर नगरपरिषदेतील महिला व बालकल्याण समिती व तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हे फेस्टिव्हलचे सहयोगी प्रायोजक आहेत. मंगळवार दि. 17 मार्चपर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. रविवारी दुपारी ‌‘कस्तुरी‌’च्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव यांनी फेस्टिव्हलला भेट दिली. यावेळी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव, पालिकेतील महिला बालकल्याण सभापती सुप्रिया पाटील, मधू देसावळे आदींनी स्वागत केले.

अध्यक्षा स्मितादेवी जाधव म्हणाल्या, दै. पुढारी कस्तुरी क्लबने महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. हा फेस्टिव्हल निश्चितच परिसरासाठी पर्वणी ठरत आहे. सायंकाळी शहर व परिसरातील नागरिक फेस्टिव्हलमध्ये दाखल होत होते. रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता. मुलांनी खाद्यपदार्थांवर ताव मारला. तेथे असलेल्या खेळांचा आनंदही लुटला. रात्री मिस - मिसेस कस्तुरी ईश्वरपूर 2026 स्पर्धेचे उद्घाटन रूपाली जाधव, स्नेहल नायकवडी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत 30 महिलांनी सहभाग नोंदवला होता.

शर्मिला कांबळे (शर्मिला पार्लर), रोहिणी लोखंडे (बी फॉर यू पार्लर), सुजाता थोरात (समृद्धी पार्लर), ज्योती माने (गायत्री पार्लर), दीप्ती जगताप (पूर्वा पार्लर), नंदा हुलनवार (शृंगार पार्लर), शीतल कुंभार (ज्ञानेश्वरी ब्युटी पार्लर), माधुरी डोईफोडे (समीक्षा मेकओव्हर अँड द ब्युटी पार्लर), रूपाली मदेशिया (कर्ली-वर्ली स्कीन केअर हेअर मेकअप अकॅडमी), मनोरमा कांबळे (मनोरमा पार्लर) या ब्युटीशियन होत्या. पूजा मुडलगी या ड्रेसच्या प्रायोजक होत्या. वेदिका ज्वेलरी वन ग्रॅमचे भारत पाटील हे ज्वेलरीचे प्रायोजक होते. सुनील चव्हाण, संग्राम कांबळे हे कोरिओग्राफर होते. दीपाली पाटील, निकिता रावल या परीक्षक होत्या.

फॅशन शोमध्ये पारंपरिक, इंडो वेस्टर्न आदी वेशभूषा करण्यात आल्या होत्या. मंचासमोर प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. फेस्टिव्हलमध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्यप्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, दागिने, बॅग्ज आणि प्लास्टिक वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. शिवाय शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल आहे. चविष्ट डिशेस, चौपाटीचे प्रसिद्ध पदार्थ, साऊथ इंडियन डिशेस, बर्गर, सँडविच आदी फास्टफूड आणि अशाच वैविध्यपूर्ण स्वादिष्ट पदार्थांचे अनेक स्टॉल आहेत. शिवाय मुलांसाठी खेळाची साधनेही उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news