Sangli News : ईश्वरपूर पालिकेत विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

बांधकाम- माने, आरोग्य- डॉ. पाटील, शिक्षणला अरुणादेवी पाटील यांची वर्णी
Sangli News
ईश्वरपूर पालिकेत विषय समिती सभापती निवडी बिनविरोध
Published on
Updated on

ईश्वरपूर : उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या स्थायी, नियोजनसह विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडी गुरुवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्व समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी महायुतीला एकही सभापती पद मिळाले नाही.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची निवड झाली, तर नियोजन व विकास समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव यांची निवड झाली. पहिल्यांदाच सभागृहात निवडून आलेले संदीप माने यांना बांधकाम समिती सभापती पदाची संधी मिळाली. आरोग्य, स्वच्छता समितीच्या सभापतिपदी डॉ. संग्राम पाटील, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी एल. एन. शहा, शिक्षण व क्रीडा समिती सभापतिपदी प्रा. अरुणादेवी पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी सुप्रिया पाटील, तर उपसभापतिपदी मनीषा कुरळपकर यांची बिनविरोध निवड झाली. या प्रत्येक समितीवर सत्ताधारी गटाचे 5, तर विरोधी गटाचे 2, असे 7 सदस्य निवडले.

स्थायी समितीमध्ये सर्व विषय समिती सभापतींबरोबरच सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुभाष सूर्यवंशी, जरीना पुणेकर, तर विरोधी शिवसेना-भाजप युतीचे आनंदराव पवार यांचीही निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या अण्णासाहेब डांगे सभागृहात सकाळी 10 वाजता सभापती निवडीसाठी विशेष सभा घेतली. नामनिर्देशनपत्र छाननीनंतर 2 वाजता पीठासीन अधिकारी, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी निवडी जाहीर केल्या. नूतन सभापतींचा नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या प्रा. अरुणादेवी पाटील, शिवसेना-भाजपचे गटनेते आनंदराव पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते सतेज पाटील यांच्याहस्ते सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news