Leopard Sighting : ईश्वरपूर-खेड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण

परिसरात दाट पिके असल्याने बिबट्या लपून बसण्याची शक्यता
Leopard Sighting
Leopard SightingPudahri
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर-खेड रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांना शेताच्या परिसरात बिबट्या फिरताना दिसला. ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

संबंधित परिसरात ऊस व इतर दाट पिके असल्याने बिबट्या लपून बसण्याची शक्यता आहे. राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी शेतकरी बांधव व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतात एकट्याने जाणे टाळावे, लहान मुलांना शेत परिसरात पाठवू नये, तसेच रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. शेतात कामासाठी जाताना गटाने जावे व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असेही आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news