Ishwarpur police: ईश्वरपूर पोलिसांनी 102 मोबाईल मूळ मालकांना केले परत

ईश्वरपूर पोलिस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले सुमारे 18 लाख 27 हजार किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 102 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले
Ishwarpur police
Ishwarpur police: ईश्वरपूर पोलिसांनी 102 मोबाईल मूळ मालकांना केले परतPudhari
Published on
Updated on

ईश्वरपूर : ईश्वरपूर पोलिस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले सुमारे 18 लाख 27 हजार किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 102 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले. पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून ही मोहीम राबवण्यात आली. शनिवारी पोलिस ठाण्यात बोलावून मूळ मालकांना त्यांचे मोबाईल देण्यात आले.

ईश्वरपूर शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून तसेच बाजारपेठ, बसस्थानक परिसरातून मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त केली. पथकाने जिल्ह्यातून व बाहेरील राज्यातून 102 मोबाईल हॅण्डसेट हस्तगत केले. पोलिसांनी या मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेतला व त्यांना त्यांचे मोबाईल परत केले. पोलिस हवलदार कुबेर खोत, अमोल सावंत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते, चंद्रकांत वंजारी, सायबरचे अभिजित पाटील, विवेक साळुंखे यांनी कारवाईत भाग घेतला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल मोबाईल धारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news