Graduate Constituency : ईश्वरपुरात भगवे फेटे बांधून शेकडो पदवीधरांचे मतदान

विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह
Graduate Constituency
ईश्वरपुरात भगवे फेटे बांधून शेकडो पदवीधरांचे मतदान
Published on: 
Updated on: 

ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळपासून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. येथील ईश्वरपूर हायस्कूल आणि आदर्श हायस्कूल येथील मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदारांनी गर्दी केली होती. भाजप नेते विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदवीधर मतदारांनी भगवे फेटे परिधान करून येऊन उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत चिन्मय वळसे, स्मिता कळसे, संदीपराज पवार, धनश्री चव्हाण, सुनीता मोरे आणि प्रकाश साळुंखे यांच्यासह शेकडो पदवीधर मतदार सहभागी झाले होते. शहरात दिवसभर भाजप कार्यकर्त्यांनी मतदानासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे व्यवस्थापन केले.

दरम्यान, ईश्वरपूर हायस्कूल व आदर्श हायस्कूल येथील मतदान केंद्रांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन संचालक राहुल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजप नेते ॲड. चिमण डांगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वाळवा तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली आणि माहिती घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत भाजप नेते विक्रम पाटील, शहराध्यक्ष संदीपराज पवार, मोहन वळसे, अल्ताफ तहसीलदार, विजय कळसे, बाळासाहेब पाटील, दिग्विजय उरणे, विश्वजित पाटील आणि समीरा आगा यांच्यासह कार्यकर्त्यांची टीम दिवसभर सक्रिय होती. तसेच नगरसेवक कपिल ओसवाल, अमित ओसवाल, राजवर्धन पाटील, चेतन शिंदे, सतीश महाडिक, विश्वनाथ डांगे, सुजित थोरात, अमोल ठाणेकर, राहुल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news