Ashok Kharat case : भोंदू खरात चालवत होता इंटरनॅशनल हवाला रॅकेट!

दुबईपर्यंत धागेदोरे; बडे भक्त अन्‌‍ अधिकाऱ्यांचे कवच
Ashok Kharat Case |
Ashok Kharat Case |
Published on
Updated on

नाशिक ः आपल्या काळ्या कारनाम्यांनी देशभर बदनाम झालेल्या भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून, तो मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाच्या हाती लागली आहे. या हवाला व्यवहारांचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यामुळे यातील बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहे.

या प्रकरणाची व्याप्ती पाहता, यामध्ये आता सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‌‘ईडी‌’देखील हस्तक्षेप करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवण्यासाठी खरात या मार्गाचा वापर करत होता, असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उघडकीस आले आहे. खरातच्या माध्यमातून भारतातून दुबईला आणि तिथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाण-घेवाण होत होती. यासाठी त्याने काही खासगी एजंटस्‌‍ आणि बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचे ‌‘एसआयटी‌’च्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.

विशेष म्हणजे, खरातचे हे काळे धंदे सुरळीत सुरू राहण्यासाठी त्याला काही बड्या राजकीय नेत्यांनी, वजनदार भक्तांनी आणि काही भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या पाठबळामुळेच इतक्या मोठ्या स्तरावर हा आर्थिक गुन्हा राजरोसपणे सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.

डायऱ्या, डिजिटल पुरावे अन्‌‍ बँक खात्यांचे तपशील ‌‘एसआयटी‌’कडे

खरातने केलेल्या व्यवहारांच्या काही डायऱ्या, डिजिटल पुरावे आणि बँक खात्यांचे तपशील ‌‘एसआयटी‌’ला मिळाले आहेत. या पुराव्यांवरून हा आर्थिक गुन्हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून, यामध्ये परकीय चलन विनियम कायद्याचे उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news