तासगाव : पुढारी वृत्तसेवा : तासगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर आरवडे व चिंचणी ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली. २४ गावातील १८ सदस्य बिनविरोध झाले आहेत. अर्ज माघारीनंतर २४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६५ आणि २४६ सदस्य पदासाठी ४४६ असे एकूण ५११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सरपंच पदासाठी १५५ तर सदस्य पदासाठी ८७२ असे एकूण १०२७ अर्ज दाखल झाले होते. चिंचणी गावातून सरपंच पदासाठी सर्वाधिक १३ अर्ज दाखले झाले होते. मणेराजुरी गावातून सदस्य पदासाठी सर्वाधिक ७४ अर्ज दाखल झाले होते.
छाननीवेळी सरपंचपदाचे नागाव निमणी आणि कुमठे येथील प्रत्येकी दोन आणि अंजनी येथील एक असे पाच अर्ज अवैध ठरले. सदस्य पदाचे नागाव निमणी येथील पाच, कुमठे येथील तीन, मतकुणकी येथील दोन व उपळावी येथील एक अर्ज अवैध ठरले होते. सरपंच पदाचे १५० व सदस्य पदाचे ८०६ जणांचे ८६१ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चिंचणी आणि आरवडे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. २४ गावातील सरपंच पदासाठीच्या ८३ आणि सदस्य पदासाठीच्या ३२७ व्यक्तींच्या ३६१ अर्जांची माघार झाली.
चिंचणी (सरपंच) (१७), आरवडे (सरपंच) (११), भैरववाडी (५), अंजनी (४), बेंद्री (३), कुमठे (१), नेहरुनगर (१), मतकुणकी (१), वंजारवाडी (१), शिरगाव कवठे (१), पानमळेवाडी (१) असे आहेत.
अंजनी (४)(१७), आरवडे (बिनविरोध), बेंद्री (२)(११), भैरववाडी (२) (९), नागाव निमणी (२)(१८), पानमळेवाडी (२)(१३), सावर्डे (२)(२६), उपळावी (२)(२३), वायफळे (३)(२६), बलगवडे (२)(१८), खुजगाव (४)(१८), कुमठे (२)(२९), लिंब (२)(१४), नागेवाडी (२)(१५), निमणी (३)(१८), पुणदी (२)(१८), शिरगाव कवठे (२)(१७), वंजारवाडी (३)(१७), मणेराजुरी (३)(३५), मतकुणकी (३)(२१), बस्तवडे (६)(२९), वासुंबे (३)(३०), चिंचणी (बिनविरोध), कचरेवाडी (२)(१४), नेहरुनगर (२)(१७), योगेवाडी (५)(१९) अशी गावांची नावे आहेत.