सांगली : इंगळे तलावातून बेकायदा मुरूम उत्खनन?

तलावाची खोली वाढविण्यासाठी उत्खनन : पलूस नगरपरिषदेचा खुलासा
Ingle Lake
इंगळे तलावातून बेकायदा उत्खनन File Photo

पलूस : पलूस तहसीलपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर इंगळे पाझर तलाव आहे. नगरपरिषद प्रशासनाने गाळ उपसण्याचे कारण सांगून महसूल विभागाची परवानगी न घेता शेकडो ब्रास मुरूम उत्खनन केले आहे. राजरोजसपणे मुरूम उत्खनन होताना महसूल विभाग गप्प का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Ingle Lake
सांगली : खडी क्रेशरचे लोखंडी पार्ट चोरणारी टोळी गजाआड

येथील इंगळे पाझर तलाव सध्या पाण्याने भरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तलावातून गाळ उपसता येत नाही. मुरूम उत्खनन करायचे असेल तर महसूल विभागाची परवानगी असणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने गाळ उपसण्याचे कारण दिल्याचे समजते. परंतु, तलावातील गाळ न उपासता मुरुम उत्खनन केले आहे. उत्खननाबाबत अनेक समाजिक संघटना, मनसे व स्थानिक नागरिकांनी तहसीलदार यांना भेटून सांगितले आहे. सर्वसामान्यांनी परवानगी नसताना मुरूम उत्खनन केले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. आता नगरपरिषदेवर महसूल विभाग कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इंगळे पाझर तलावात उत्खननाबाबत पलूस तहसीलदार यांच्याकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर उत्खनन सुरू केले. त्यावेळी महसूल विभागाने वन विभागाची जागा आहे, त्यांची ना हरकत घ्या, असे सांगितले. वन विभागाशी संपर्क केला असता ती जागा वन विभागाची नसल्याचे सांगितले. तलावातील खोली वाढविण्यासाठी गाळ व मुरूम काढला. गेल्या सहा दिवसांपासून महसूल विभागाकडे परवानगीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अद्याप कोणतीही कारवाई नाही.
निर्मला राशीनकर-यमगर, मुख्याधिकारी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news