Sangli News : ...अन्यथा वैभव नायकवडींच्या घरासमोर ठिय्या

आंदोलकांचा इशारा : अध्यक्षांनी आज चर्चेला येण्याचे आवाहन
Hutatma Sugar Factory
वाळवा : हुतात्मा शेतकरी, सभासद आंदोलकासमोर बोलताना गौरव नायकवडी.
Published on
Updated on

वाळवाः हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी उद्या (गुरुवारी) आंदोलक शेतकरी व सभासदांसमोर हजर राहावे, अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला.

कारखान्यावर असलेले सुमारे साडेपाचशे कोटींचे कर्ज फेडावे, या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. गौरव नायकवडी म्हणाले, “हुतात्मा कारखाना उभा करताना ज्यांनी अण्णांना साथ दिली, ते आज आंदोलनात उतरले आहेत. कारखाना कसा वाचेल यापेक्षा आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यातून कोट्यवधींचा फायदा घेणारे वैभवकाका सहजासहजी राजीनामा देणार नाहीत. त्यांनी वैयक्तिक संपत्ती वाढवून कारखाना कर्जबाजारी केला. उद्या आमदार विनय कोरे यांना चर्चेसाठी बोलावले असून वैभव नायकवडी यांनीही उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.

केदार नायकवडी, किरण नायकवडी यांनीही यावेळी टीकेची झोड उठवली. यावेळी विजय पाटील (नागठाणे), पांडुरंग अहिर, वसंत वाजे, संजय अहिर, सरपंच संदेश कांबळे आदींनी मनोगते व्यक्त केली. बाळासाहेब पाटील, माजी अध्यक्ष महादेव कांबळे, उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, सावकार कदम, अरुण यादव, सनी अहिर, वैभव खोत आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news