Sangli Accident : हुबालवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; चालक पसार

ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangli Accident
हुबालवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
Published on
Updated on

ईश्वरपूर : हुबालवाडी (ता. वाळवा) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शामराव बाबू माने (वय 90, रा. हुबालवाडी) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, दि. 4 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नातू रोहित माने यांनी फिर्याद दिली आहे.ृ

याबाबत अधिक माहिती अशी की, शामराव माने हे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे नातू रोहित माने यांनी त्यांचा शोध घेतला असता, हुबालवाडी ते बहे रस्त्यावरील ज्योतिर्लिंग मेडिकलजवळ ते जखमी अवस्थेत मिळून आले. घटनास्थळी वाहनाच्या ब्रेकच्या खुणा आढळून आल्या. अपघातानंतर वाहन चालक तेथून पसार झाला आहे. जखमी शामराव यांना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news