Sangli Theft News |
Sangli Theft News | विश्रामबाग, सांगलीवाडीत घरफोडीFile Photo

Sangli Theft News | विश्रामबाग, सांगलीवाडीत घरफोडी

पाच लाखांचा मुद्देमाल लंपास; भरदिवसा घटना
Published on

सांगली : शहरात बंद फ्लॅट, घर फोडून चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. गुरुवारी भरदिवसा विश्रामबाग व सांगलीवाडी येथे चोरट्यांनी घर फोडून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

विश्रामबाग येथील कुंभार मळा परिसरात चंद्रलोक अपार्टमेंटमधील फ्लॅट चोरट्यांनी फोडला. दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटे आत शिरले. बेडरूममध्ये कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 53 हजार रुपये किमतीचे 9.790 ग्रॅम सोन्याचे झुबे, फुले, 50 हजार रुपये किमतीचे मिनी गंठण व रोख 41 हजार 900 रुपये असा 1 लाख 45 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना दि. 29 रोजी दुपारी 12 ते दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी अभिजित विजय नाईक (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.

सांगलीवाडीतील अश्विनी अनुराग पाटील (वय 37) यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाखाचे सोन्याचे गंठण, 90 हजारांचे मिनी गंठण, 60 हजारांची वेढण अंगठी, 30 हजारांची चेन, 18 हजार रुपयांचे कानातील टॉप्स, असा 3 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार दि. 29 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news