सांगलीत दोन मोटारींची धडक; एकजण जखमी

सांगलीत दोन मोटारींची धडक; एकजण जखमी

सांगली : पुढारी वृत्तसेवा दोन मोटारींची धडक होऊन एका मोटारीचा चक्काचूर झाला. यामध्ये एकजण जखमी झाले आहेत. शंभरफुटी ते शामरावनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर झुलेलाल मंदिरजवळ हा अपघात झाला. मोटारीचे दोन लाखाचे नुकसान झाले
आहे.

रमाकांत विठोबा सुतार (वय 53, रा. कुपवाडफाटा, सांगली) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या मनगटाचे हाड मोडले आहे. ते त्यांच्या मोटारीतून (क्र. एमएच 50 एल-4485) निघाले होते. त्याचवेळी दुसरी मोटार (एमएच 04 एफएफ-8594) निघाली होती. यामधील चालक वाहिद आजम तांबोळी (वय 20, रा. पाकीजा मशिदीजवळ, सांगली) याने सुतार यांच्या मोटारीला जोराची धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, सुतार यांची मोटार उलटली. तिचा चक्काचूर झाला. यामध्ये दोन लाखाचे नुकसान झाले. अपघातानंतर लोकांची गर्दी झाली होती. शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सुतार यांची फिर्याद घेऊन वाहिद तांबोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news