Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांची जीभ घसरली; इचलकरंजीची केली पाक व्याप्त काश्मिरशी तुलना

'धैर्यशील मानेंनी वादळात दिवा लावला'
Harshvardhan Patil  controversial comment
वाळवा येथे बोलताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वादग्रस्त विधान केले. Pudhari News Network

सांगली : पुढारी वृत्तसेवा : खासदारकीच्या निवडणुकीत अदृष्य शक्तींनी घरेलेले असताना देखील पाक व्याक्त काश्मिर सारख्या इचलकरंजीमध्ये धैर्यशील माने यांनी वादळात दिवा लावला आहे, असे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या १०२ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. (Harshvardhan Patil on Ichalkaranji)

Harshvardhan Patil  controversial comment
सांगली : दोन कारच्या भीषण धडकेत गोव्यातील महिलेचा मृत्यू

धैर्यशील मानेंना अदृष्य शक्तींनी घेरले होते

यावेळी ते म्हणाले की, यावेळी लोकसभा निवडणूक धैर्यशील माने यांच्यासाठी अटीतटीची होती. त्यांना काही अदृष्य शक्तींनी घेरले होते. तरी देखील धैर्यशील माने यांनी पाक व्याप्त काश्मीर सारख्या असणार्‍या इलचकरंजीमधून वादळात दिवा लावून विजय मिळवला आहे. धैर्यशील माने यांच्या विजयाचे कौतुक करताना मात्र हर्षवर्धन पाटील यांची जीभ घसरली आहे. त्यांनी थेट इलकरंजीची पाक व्याप्त काश्मीरशी तुलना केली. त्यामुळे याची जोरदार चर्चा होत आहे. (Harshvardhan Patil on Ichalkaranji)

Harshvardhan Patil  controversial comment
सांगली : प्रतापसिंह उद्यानात साकारतेय पक्षी संग्रहालय

धैर्यशील माने यांचा विधानाला दुजोरा

तर यावेळी बोलताना धैर्यशील माने म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस सगळे माझ्या सोबत होते. काही अदृष्य शक्ती देखील माझ्या सोबत होती. परंतु त्यांचे नावे घेतले तर अवघड होईल. तसेच लोकसभा निवडणुकीत होता जीवा म्हणून वाचला शिवा, असे सांगत धैर्यशील माने यांनी देखील काही अदृष्य शक्तींनी त्यांना सहकार्य केले असल्याचे स्पष्टोक्ती यावेळी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news