Sangli Crime: घरफोडी, दुचाकी चोरीतील सराईत चोरटा जेरबंद

एलसीबीची कारवाई : सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

सांगली : घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. सुनील मारुती धुमाळ (वय 20, रा. चौगुले मळा, झोपडपट्टी, मिरज) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तीन मोठे गुन्हे उघडकीस आणले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, संशयित तरुण चोरीची मोटार सायकल आणि मोबाईल विक्री करण्यासाठी ते वारणाली गेट रोड परिसरात येणार आहे. पोलिसांनी सापळा रचला आणि विद्यानगर गल्ली नं. 7 जवळ विना नंबर प्लेटच्या दुचाकीसह थांबलेल्या सुनीलला ताब्यात घेतले.

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सुनीलची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने पंधरा दिवसापूर्वी कोल्हापूर रोडवरील एका फर्निचरच्या दुकानाचा पत्रा उचकटून रोख रक्कम आणि मोबाईल चोरले होते. त्याच्याकडील दुचाकी त्याने मिरजेतील इंदिरानगर परिसरातून चोरली होती.

तसेच, 10 महिन्यांपूर्वी मिरजेतूनच आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे तपासासाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news