सांगली : गुढे-पाचगणी, येवतीचे उद्यापासून सर्व्हे

शिराळा, कराड व पाटण तालुक्यांतील 105 गावांचा समावेश : 1 कोटी 65 लाख 44 हजार रुपयांचा निधी मंजूर
Irrigation scheme
जलसिंचन योजना
Published on
Updated on
आष्पाक आत्तार

वारणावती : सांगली जिल्ह्यातील शिराळा, तसेच सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण, अशा तीन तालुक्यांतील 105 गावांसाठी गुढे-पाचगणी व येवती-म्हासोली अशा दोन वेगवेगळ्या उपसा जलसिंचन योजनांना तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. या सर्वेक्षणासाठी शासनाकडून 1 कोटी 65 लाख 44 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंगळवार, दि. 21 पासून वारणावती येथून सर्वेक्षण सुरू होणार आहे.

या योजनेसाठी डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक मुक्ती दलाने मणदूर (ता. शिराळा) येथील हुतात्मा स्मारक परिसरात तब्बल 38 दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर मंत्रालयात डॉ. पाटणकर, आमदार सत्यजित देशमुख, शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ही योजना कशी लाभदायी आहे, हे पटवून देण्यात आले. त्याचे फलित म्हणून ही योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनांमुळे शिराळा, कराड व पाटण या तिन्ही तालुक्यांतील तब्बल वीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शिराळा तालुक्यासाठी गुढे-पाचगणी उपसा जलसिंचन योजना, तर कराड व पाटणसाठी ‘येवती-म्हासोली’ योजनेला शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

या योजनेमुळे शिराळा तालुक्यातील 60, कराड दक्षिण भागातील 35, तर पाटण तालुक्यातील 10 गावांना लाभ होणार आहे. दुर्गम आणि वंचित भागातील शेतकर्‍यांना पाणी बांधापर्यंत येण्यासाठी या योजनेतून प्रयत्न होणार आहेत. गुढे-पाचगणी योजनेसाठी 730 कोटी, तर ‘येवती- म्हासोली’ योजनेसाठी 400 कोटी खर्च अपेक्षित आहे. या योजनेमुळे पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता होईल. अनेक शेतकरी बागायतदार होतील. रोजगारासाठी होणारी भटकंती थांबेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढल्यामुळे आर्थिक दर्जाही उंचावेल.

तालुकानिहाय समाविष्ट गावे...

शिराळा तालुका : मणदूर, खुंदलापूर, नवीवाडी, जाधववाडी, मिरुखेवाडी, विनोबाग्राम, सोनवडे, मणदूर-धनगरवाडा, कोळेकरवाडी, गुढे, झळकेवाडी, सावंतवाडी, खोतवाडी, पाचगणी, मानेवाडी, ढाणकेवाडी, बांबरवाडी, आरळा, सिद्धार्थनगर, इनामवाडी, चांदोलीवाडी, भाष्टेवाडी, पाटीलवाडी, धामणकर वस्ती, भाष्टेवस्ती, भाडुगळेवाडी, येसलेवाडी, बेरडेवाडी, कोकणेवाडी, गुंडगेवाडी, करुंगली, मराठवाडी, खराळे, काळुंद्रे, काशीदवाडी, चिंचेवाडी, खोतवाडी, पणुंब्रे वारुण, वाकाईवाडी, डफळेवाडी, बोरगेवाडी, कुसळेवाडी, कदमवाडी, मोहरे, चरण, केंद्रेवाडी, काळमवाडी, नाठवडे, शेडगेवाडी, मेणी, बेरडेवाडी, सावंतवाडी, आटुगडेवाडी, रांजणवाडी, माळवाडी, शिरसटवाडी, चव्हाणवाडी, येळापूर, पोळ वस्ती, खटिंगवाडी, जामदारवाडी, वाघमारेवाडी, हापेवाडी, समतानगर, लाडवाडी, दीपकवाडी, आटुगडेवाडी, गवळेवाडी, सय्यदवाडी, अंबाबाईवाडी, कुंभवडेवाडी, सय्यदवाडी, हत्तेगाव, वाघमारेवाडी, खिरवडे, खुजगाव, चिंचोली, मोरेवाडी, वीरवाडी, बिळाशी, माळेवाडी, कोकरूड, मांगरूळ, कुंभारवाडी, दुरंदेवाडी, कुसाईवाडी, धसवाडी, मोरेवाडी, शिंदेवाडी, रिळे, बेलेवाडी, अस्वलवाडी, पावलेवाडी.

कराड तालुका : शेवाळेवाडी, अकाईवाडी, धोत्रेवाडी, जिंती, कोचरेवाडी, चव्हाण मळा, भुसाळ शिरंबे, महारुगडेवाडी, खुडेवाडी, मनव, सावंतवाडी, चोरमारवाडी, एनपे, माटेकरवाडी, शेवाळेवाडी, येळगाव, लोहारवाडी, गवारकरवाडी, मुळीकवाडा, मोटेगाव, गणेशवाडी, मस्करवाडी, येवती, काजारवाडी, मुटलवाडी, भरघोशी, भरेवाडी, शेवाळेवाडी, घराळवाडी, काटेकरवाडी, दुधडेवाडी, हनुमंतवाडी, कुंभारवाडा, शेळकेवाडी येवती, शेळकेवाडी म्हसोली, शेवाळेवाडी म्हसोली, वीरवाडी, म्हासोली सवादे, लटकेवाडी, हवेलवाडी, नाईकवडीवाडी, पवारवाडी, बांदेकरवाडी, ओंड, पाचुपतेवाडी, तुळसण, विठोबाचीवाडी, थोरात मळा, कोंडोशी, पाटील मळा, नवीन नांदगाव, नांदगाव, पवारवाडी, शेवाळेवाडी नंबर एक, शेवाळेवाडी नंबर दोन, उंडाळे, टाळगाव, शेवाळवाडी, भोगाव, शेवाळवाडी.

पाटण तालुका : सावंतवाडी, लोहारवाडी, चव्हाणवाडी, रामेश्वरवाडी, शेडगेवाडी, काळेवाडी, भरेवाडी, मुटलवाडी, आचरेवाडी, कोळगेवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news