Atpadi Grocery shop theft: आटपाडीत किराणा दुकान फोडले; गुन्हा दाखल

42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

आटपाडी : आटपाडीतील विठ्ठलनगरमधील साई किराणा दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व किराणा माल असा एकूण 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विठ्ठलनगर येथील किराणा व्यावसायिक प्रतीक सदाशिव जाधव (वय 21) यांच्या श्री साई किराणा या दुकानाचे शटर 22 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.30 ते 23 जानेवारी रोजी सकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानात प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम अंदाजे 10 हजार 500 रुपये आणि साखर, शेंगदाणे, खोबरे, साबणाचे दोन बॉक्स, सरकी तेलाचे सहा बॉक्स असा एकूण 8,400 रुपयांचा मुद्देमाल असा 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत प्रतीक जाधव यांच्या तक्रारीवरून आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news