Gopichand Padalkar : डीडीएसआर ग्रुपची चौकशी करा

आमदार पडळकर यांची विधानसभेत मागणी
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar (Pudhari Photo)
Published on
Updated on

जत : राज्यातील ग्रामीण भागातील हजारो गुंतवणूकदारांची डीडीएसआर ग्रुपमार्फत फसवणूक झाल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत केला. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्त स्तरावर आणि जीएसटी विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. डीडीएसआर ग्रुपने विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावाने प्लॉट आणि फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकडून मोठी गुंतवणूक गोळा केली आहे. डीडीएसआर हाईट्स, तथागत, स्वप्नपूर्ती, मातोश्री, मैत्री, अजिंक्य, हेरिटेज अशा सुमारे 18 प्रकल्पांच्या माध्यमातून ही उलाढाल झाली आहे, असे पडळकर यांनी नमूद केले.

सुमारे 4 ते 5 हजार गुंतवणूकदार यामुळे प्रभावित झाले असून हा घोटाळा 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संबंधित व्यक्ती आयआरएस अधिकारी असल्याने गुंतवणूकदार भीतीपोटी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यासंदर्भातील अनियमितता पाहता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने चौकशीचे निर्देश दिले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिस आयुक्त स्तरावर चौकशी केली जाईल. तसेच जीएसटी विभागामार्फतही आर्थिक व्यवहारांचा तपास केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news