Gopichand Padalkar : विभाग नियंत्रक भोकरे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

आ. गोपीचंद पडळकर; परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar (Pudhari Photo)
Published on
Updated on

सांगली : सांगली एसटीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

परिवहनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुनील भोकरे सांगली विभागात हजर झाल्यापासून त्यांचा कारभार वादग्रस्त राहिला आहे. त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने स्थानिक खरेदी केली आणि स्वतःच्या फायद्यासाठी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी सुरक्षा व दक्षता विभागाने चौकशी करून अहवाल सादर केला असून त्यात भोकरे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

वाहनांचे सुटे भाग (स्पेअर पार्टस्) आणि इतर साहित्यासाठी नियमानुसार करार केलेले असतानाही, भोकरे यांनी त्या कराराप्रमाणे खरेदी न करता इतर ठिकाणांहून स्थानिक खरेदी केली. यामुळे महामंडळाचे 10 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. दक्षता विभागाचा अहवाल प्राप्त होऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे पडळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news