

सांगली : ‘मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे?’ या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी येथे टीका केली. सांगलीत बाळासाहेब गलगले फाऊंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना ‘धर्मरक्षक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे विधान केले.
ते म्हणाले, माझ्या पांडुरंगाला मटण चालते असे एक विधान आले, मात्र आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही. ज्या देवाला मटण चालतेय असा तुमचा असा कोणता देव आहे असे म्हणता, मग तो मशिदीत असावा आणि त्यांचा तो देव असावा, त्याला ते देव मानत असतील किंवा त्या देवाला मटण चालत असेल. ते म्हणाले, आज वारकर्यांच्या मनाच्या खच्चीकरणासाठी अशी विधाने केली जात आहेत का? आज मताच्या राजकारणासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही.
हरिपूर : कृष्णेला आलेल्या पुराचे पाणी आता नदीपात्रात गेले. पुराचे पाणी येऊन गेल्यानंतर लोखंडी पुलाजवळ नाल्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे महापालिकेने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.