Goa liquor seizure
Goa liquor seizure: आंबोलीत गोव्याची दारू जप्त; संशयित सांगलीचे शक्य Pudhari

Goa liquor seizure: आंबोलीत गोव्याची दारू जप्त; संशयित सांगलीचे शक्य

दोघे जंगलात पसार; कार सांगली जिल्ह्यातील
Published on

सावंतवाडी/ आंबोली : गोवा दारूसह कार असा एकूण 13 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी येथे जप्त केला. कारवाईवेळी गाडीतील दोन अनोळखी संशयित अंधारात जंगलात पळून गेले. त्यांच्याविरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ताब्यात घेतलेली कार सांगली आरटीओ पासिंग असून यामुळे संशयित सांगली जिल्ह्यातील असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

आंबोली पोलिस शनिवारी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास चौकुळ ते कुंभवडेदरम्यान रात्री गस्त घालत होते. हवालदार मनीष शिंदे आणि गौरव परब केगदवाडी चौकुळ- कुंभवडे रस्त्यावर उभे होते. याचदरम्यान, केगदवाडी येथे सांगली पासिंगची कार संशयास्पद आढळून आली. त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांना पाहून कार चालकाने गाडी रिव्हर्स घेऊन अंधारात थांबवली. यावेळी चालक आणि त्याच्यासोबत असलेला अन्य एक असे दोघेही पसार झाले. पोलिसांना वाहनामध्ये गोवा दारूचे 12 बॉक्स आढळून आले. या दारूची किंमत रुपये 1 लाख 44 हजार असून, गाडीची किंमत रुपये 12 लाख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news