Gandevi Sugar Factory : उसास प्रतिटन उच्चांकी 4,701

देशात गणदेवी कारखान्याचा ऊसदर उच्चांकी
Sugarcane
SugarcaneFile Photo
Published on
Updated on

विवेक दाभोळे

सांगली : गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील श्री सहकारी खांड उद्योग लि., गणदेवी या साखर कारखान्याने नुकत्याच संपलेल्या 2025-26 च्या हंगामात 7 लाख 1 हजार 685 टन उसाचे गाळप करत, 8 लाख 15 हजार 200 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखानापोहोच उसाला प्रतिटन 4,701 रुपये असा सर्वोच्च दर जाहीर केला आहे. हा देशातील सर्वाधिक दर ठरला. विशेष म्हणजे गणदेवी कारखान्याचा या हंगामाचा सरासरी साखर उतारा हा 11.63 टक्के इतका राहिला आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले म्हणाले, गेली दोन दशके या साखर कारखान्याने देशात सर्वोत्तम ऊसदर देण्याची परंपरा कायम राखली. इतकेच नव्हे, तर गुजरातमधील इतरही सहकारी साखर कारखाने तेथील शेतकऱ्यांना असाच उत्तम दर देत आले आहेत. दक्षिण महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील उसाचा 12.50 टक्केपेक्षा जास्त साखर उतारा असतानाही सहकारसम्राटांच्या ताब्यातील व खासगी कारखाने ऊसदर देण्यात मागे पडले आहेत. नेते बनलेल्या कारखानदारांकडून वर्षानुवर्षे ही लूट चालू आहे.

गुजरातमधील बार्डोली साखर कारखान्याने 3672 ते 3872, कामरेज येथील कारखान्याने 3725 ते 3925, सायन कारखान्याने 3676 ते 3831, मढी कारखान्याने 3512 ते 3612, चलठान कारखान्याने 3406 ते 3506, महुआ कारखान्याने 3101 ते 3301, तर नर्मदा साखर कारखान्याने 3675 असा दर देण्याचे जाहीर केले आहे. हे दर कमी साखर उतारा असून देखील दिले आहेत.

गणदेवी कारखाना

मार्च- 2026 मधील गाळपास - 3931 रुपये (तोडणी व वाहतूक खर्च 770 रुपये वजा जाता)

फेब्रुवारीतील गाळपास- 3831

जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबरमध्ये - 3731

- महाराष्ट्रात प्रतिटन 3500 रुपयांवर बोळवण

‘गणदेवी‌’ने हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टोबर 2025 मध्ये पहिली उचल तो / वा खर्च रुपये 770 धरून प्रतिटन 3270 रुपये व फेब्रुवारीत येणाऱ्या उसाला 100 रुपये, मार्चला 200 रुपये तर जादा देण्याचे जाहीर केले होते. म्हणजेच येत्या दिवाळीपूर्वी गणदेवी 1231 ते 1431 रुपये देणार आहे आणि महाराष्ट्रातील कारखानदार, आम्ही 3500 रुपये दर दिल्याने 700 रुपये तोट्यात गेलो आहोत असे खोटेच सांगताहेत. खरे तर एकरकमी मोठ्या रकमेत पहिली उचल घेणे आपल्याला तोट्याचे होते, हे शेतकऱ्यांनीही ध्यानात घ्यावे.
- संजय कोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news