Chain Theft: ट्रॅफिक पोलिस असल्याचे सांगून वृद्धाची सव्वा लाखाची चेन लंपास

अलकुड (एस) (ता. कवठेमहांकाळ) येथील मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वृद्धाला ट्रॅफिक पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्यात आले
Chain Theft: ट्रॅफिक पोलिस असल्याचे सांगून वृद्धाची सव्वा लाखाची चेन लंपास
Pudhari File Photo
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : अलकुड (एस) (ता. कवठेमहांकाळ) येथील मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वृद्धाला ट्रॅफिक पोलिस असल्याची बतावणी करून लुटण्यात आले. कृष्णा गणू पांढरे (वय 71, रा. शिंगणापूर ता. जत) यांच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची चेन चोरट्यांनी लुबाडली. ही घटना बुधवारी घडली. कृष्णा पांढरे हे बुधवारी अमावस्या निमित्त अलकूड एस येथील मंदिरात दर्शनासाठी गेले होते.

जत-कवठेमहांकाळ रस्त्याने शिंगणापूर गावाकडे निघाले होते. पांढरे यांच्या पाठीमागून तीन मोटरसायकली आल्या. एकाने मोटरसायकल पांढरे यांच्या समोर उभी केली. दोघांनी त्यांच्या पाठीमागे थांबले.

त्यातील एकाने पांढरे यांना ‌‘मी ट्रॅफिक पोलिस आहे. तुम्हाला चेन घालण्याची परवानगी आहे का‌’ असा प्रश्न विचारला. चेन काढून पिशवीत ठेवण्यास सांगण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या व पांढरे यांच्या पाठीमागे उभी असलेल्या दुसऱ्या मोटरसायकलवरील इसमाने त्याच्या गळ्यातील चेन काढून त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत ठेवली. पांढरे यांनी त्यांच्या गळ्यातील चेन कागदाच्या पुडीत बांधून पिशवी ठेवली. हातचलाखीने चेन काढून घेऊन ते कवठेमहांकाळ च्या दिशेने निघून गेले. पांढरे यांनी पिशवी उघडून पाहिले असता त्यामध्ये दगड आढळून आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कवठेमहांकाळ पोलिसात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news