Sangli Investment fraud: जादा परताव्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

शिराळा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल
fraud
fraudPudhari News Network
Published on
Updated on

शिराळा : ट्रेडिंग व्यवसायातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची ४७ लाख २३ हजार ८६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिराळा पोलिसात पुण्यातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नीलिमा मनोज इंगोले, मनोज मोहन इंगोले व भार्गवी मनोज इंगोले (सर्व रा. रावेत, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अरिफा शब्बीर फकीर (रा. ईश्वरपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

संशयितांनी अरिफा व त्यांच्या पतीला गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून अरिफा व त्यांच्या पतीने २२ मार्च २०२३ पासून विविध टप्प्यांवर एकूण ९९ लाख ९८ हजार ४२५ रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला संशयितांनी त्या गुंतवणुकीवर ५२ लाख ७५ हजार ३३९ रुपये परताव्याच्या स्वरूपात परत केले. मात्र, त्यानंतर उर्वरित मूळ रक्कम आणि त्यावरील परतावा देण्यास टाळाटाळ केली.

फिर्यादींनी वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या व्यवहारात आपली एकूण ४७ लाख २३ हजार ८६ रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news