पलूस; पुढारी वृत्तसेवा : सकाळी गारवा, दुपारी उष्मा व सायंकाळी ढगाळ वातावरणाने होणारी तगमग असे सरमिसळ वातावरण पलूस तालुक्याने अनुभवले. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्म्याचा कडाका वाढण्यास सुरुवात झाला. त्यामुळेच वळीवाने सलामीही दिली. या आठवड्यात तापमानाने कहर केला. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागात वळीवाने जोरदार हजेरी लावली.
काही भागात हा पाऊस झाला नसला तरी हवेत गारवा होता. आज पहाटेपासून दाट धुक्याने कृष्णाकाठासह संपूर्ण तालुक्यातील गावांना व्यापून टाकले.