विशाल पाटील-संजय पाटील यांच्यात हमरीतुमरी

तासगावात राडा ः बाह्यवळण रस्त्याच्या श्रेयवादातून चढाओढ
Sangli News
तासगाव ः माजी खासदार संजय पाटील व खासदार विशाल पाटील हे समोरासमोर आल्यानंतरचा क्षण. Pudhari Photo
Published on
Updated on

तासगाव शहर ः पुढारी वृत्तसेवा

खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्यात तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांत सोमवारी जोरदार हमरीतुमरी झाली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तासगाव नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रशासकीय कार्यक्रमात हा प्रकार घडला. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते, तर खासदार विशाल पाटील, आमदार सुमन पाटील, माजी खासदार संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी खासदार पाटील म्हणाले की, आमदार सुमन पाटील, माजी खासदार संजय पाटील आणि पालकमंत्री सुरेश खाडे हे तिघेही तासगाव तालुक्यातील आहेत. मी एकटाच येथे पाहुणा आहे. यामुळे तासगाव तालुक्याचा विकास होण्यास सुरुवात झाली आहे. परवा वाहतूकमंत्री नितीन गडकरी मला म्हणाले होते की, रोहित पाटील यांना रिंगरोड मंजूर केल्याचा निरोप द्या.

यानंतर माजी खासदार संजय पाटील भाषणासाठी उठले. ते म्हणाले, विशाल पाटील, तुम्हाला या ठिकाणी सन्मान दिला जातोय, त्याला पात्र राहा. बाजारबुणगेपणा कमी करा. राजकारणात किती नौटंकी करावी, याला प्रमाण असते. राजकारणामध्ये मतभेद असतात. पक्ष वेगळे असतात. मात्र एवढा दर्जा सोडू नका, की त्यांनी केलेल्या कामाचे आपण आपल्या नावाने बोर्ड लावावेत. विशाल, तुम्ही काल खासदार झालाय. सर्वांना माहिती आहे, गडकरी आणि संजय पाटील यांचे संबंध जनतेला माहिती आहेत. याला विशाल पाटील यांनी लगेचच उत्तर दिले. ते म्हणाले, तुमचे संबंध असले तरी, मला जो निरोप द्यायला सांगितला तो मी दिला.यावर संजय पाटील यांनी, चंपुगिरी बंद करा, असे सुनावले. त्यावर विशाल पाटील म्हणाले, मी तुमचे नाव घेतले नाही, त्यामुळे तुम्ही माझे नाव घेऊ नका. विशाल पाटील पुढे येऊन बोलत असतानाच संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांमधून जोरदार दंगा सुरू झाला. विशाल पाटील यांना एकेरी भाषेत बोलण्यास सुरुवात केली. संजय पाटील म्हणाले, नौटंकी बंद करा. मला पुन्हा त्या रस्त्याला आणू नका. यावेळी वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, यानंतर आमदार सुमन पाटील आणि विशाल पाटील कार्यक्रम पूर्ण करून निघून गेले.

वादाचे हे ठरले निमित्त...

रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच तासगाव शहरातचा बाह्यवळण रस्ता (रिंगरोड) मंजूर केलेला आहे. यासंदर्भात खासदार विशाल पाटील म्हणाले, परवा वाहतूकमंत्री गडकरी मला म्हणाले होते की, रोहित पाटील यांना रिंगरोड मंजूर केल्याचा निरोप द्या. यानंतर माजी खासदार संजय पाटील म्हणाले, की हा तासगाव नगरपालिकेचा प्रशासकीय कार्यक्रम आहे. याठिकाणी रिंगरोड कोणी मंजूर करून आणला, हा विषय काढून प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचा प्रकार विशाल पाटील यांनी बंद करावा. मी दोन दिवसांत याबाबत पत्रकार परिषद घेणार होतो; मात्र तुम्ही मला बोलायला भाग पाडले.

पोलिसांचा हस्तक्षेप; काही काळ तणाव

यावेळी संजय पाटील गटातील तरुणांनी चांगलाच गदारोळ घातला. खासदार विशाल पाटील यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. काळीकाळ तणाव निर्माण झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news