Leopard clash: बिबट्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

येळापूर येथील घटना : चार दिवसात दुसऱ्या बिबट्याचा मृत्यू
Leopard clash
Leopard clashImage Source (Meta AI)
Published on
Updated on

शिराळा : येळापूर (ता. शिराळा) येथील शिवारात दोन बिबट्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत एका दीड ते दोन वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. बिबट्याच्या पोटावर खोलवर जखमा झाल्या असून, हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यातच हा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार ते पाच दिवसांत तालुक्यात दोन बिबटे मृतावस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येळापूरपैकी वाघमारेवाडीच्या पूर्वेस असलेल्या चिंचेचा गौड नावाच्या शिवारात ऊस तोडणी सुरू होती. यावेळी बंडू चव्हाण यांच्या शेतात ऊस तोडणाऱ्या कामगारांना आणि शेतकऱ्यांना एक बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसला. ही माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, हा मृत बिबट्या मादी जातीचा असल्याचे निष्पन्न झाले. दोन बिबट्यांमध्ये झालेल्या संघर्षात या मादीच्या पोटावर खोलवर जखमा झाल्याचे दिसून आले.

येळापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिथुन गुरव यांनी उत्तरीय तपासणी केली. या अहवालानुसार, दुसऱ्या मोठ्या हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात या बिबट्याचा जीव गेला आहे. येळापूर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, एकापाठोपाठ एक अशा दोन घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे पथक या परिसरात गस्त घालत असून, हिंस्त्र प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news