Drowning Death: मुलाला पोहायला शिकवताना पित्याचा बुडून मृत्यू

मांगले येथे वारणा नदीपात्रातील घटना
Death by Drowning
Death by Drowning Pudhari
Published on
Updated on

मांगले : मुलाला पोहायला शिकवताना पित्याचा बुडून मृत्यू झाला. ऋषिकेश भीमराव खामकर (35, रा. मांगले,ता. शिराळा) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी (दि. 23) दुपारी वारणा नदीवरील मांगले-काखे पुलाजवळ ही घटना घडली.

ऋषिकेश हे आठ वर्षांचा मुलगा शंभू पोहायला शिकवण्यासाठी वारणा नदीपात्रात घेऊन गेले होते. त्यांच्यासोबत नातेवाईक कार्तिक प्रकाश खामकर (वय 16) हाही होता. मांगले-काखे पुलाच्या काखे गावाकडील बाजूला ते नदीपात्रात उतरले. मुलगा शंभूच्या पाठीला सुरक्षिततेसाठी प्लास्टिकचा कॅन बांधून ऋषिकेश त्याला पोहायला शिकवत होते.

त्याचवेळी, कोडोली (ता. पन्हाळा) येथील शेती पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलचे विद्युत पंप अचानक सुरू झाले. जॅकवेलच्या दिशेने पाण्याचा प्रवाह वाढला. पाण्याचा जोर वाढल्याने ऋषिकेश यांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले. हे पाहून सोबत असलेल्या कार्तिक याने आरडाओरडा केला. आवाज ऐकून पुलावरून जाणारे काही नागरिक तातडीने नदीपात्रात धावले. त्यांनी ऋषिकेश यांना पाण्याबाहेर काढले, परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. ऋषिकेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

कॅन बांधल्याने मुलगा वाचला

ऋषिकेश यांच्या मुलाच्या शंभूच्या पाठीला कॅन बांधलेला असल्याने तो पाण्यात तरंगत होता; नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news