Fake death certificate: जमीन लाटण्यासाठी महिलेचे बनवले बनावट मृत्युपत्र

जानराववाडी येथील घटना : दोघांविरुद्ध गुन्हा
death certificate
death certificatePudhari
Published on
Updated on

मिरज : जानराववाडी (ता. मिरज) येथे जमीन हडपण्यासाठी महिलेचे बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कमल शहाजी बिसुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप श्रीमंत बिसुरे आणि सागर दिलीप बिसुरे या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पतीच्या निधनानंतर त्यांच्या जमिनीवर कमल यांचे नाव वारस म्हणून लावण्यात आले होते. मात्र, जानराववाडी येथील ही जमीन लाटण्याच्या उद्देशाने संशयित दिलीप बिसुरे आणि सागर बिसुरे यांनी संगनमत केले. त्यांनी कमल बिसुरे जिवंत असतानाच त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार केले आणि त्याआधारे जमीन स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला.

हा फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच कमल बिसुरे यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news