Sangli news : सांगलीत ‘अॅग्रीपंढरी’ची उत्सुकता शिगेला
सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या ‘पुढारी अॅग्रीपंढरी' या भव्य पीक प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. बारामतीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 10 एकर क्षेत्रांवर साकारलेल्या 40 हून अधिक पिकांच्या लाईव्ह प्लॉट्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 20 ते 23 फेबुवारी 2026 या कालावधीत सांगलीत भरणाऱ्या या कृषी महोत्सवासाठी शेतकरी आणि कृषी कंपन्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
दै. ‘पुढारी’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, ‘ऑर्बिट क्रॉप न्युट्रिएंट’ हे मुख्य प्रायोजक असून ट्रॅव्हल पार्टनर अ हेवन हॉलिडेज् आहेत. सहप्रायोजक कन्हैया ॲग््राो आहे. गिफ्ट स्पॉन्सर सोन रूपम जेम्स ॲन्ड ज्वेलरी हे असणार आहेत.नोव्हेंबर महिन्यात मशागत पूर्ण झाल्यानंतर, प्लास्टिक मल्चिंग आणि संरक्षित शेतीतील विविध आधुनिक तंत्राचा वापर करून लावलेल्या पिकांची वाढ आता जोमदार झाली आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसांत शेतकऱ्यांना पूर्ण वाढलेली ही पिके प्रत्यक्ष पाहता येणार आहेत.
शेती क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांची ही सांगलीतील सर्वात मोठी पर्वणी ठरणार आहे. बारामतीनंतर महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सांगलीत हे पीक प्रात्यक्षिक राबवले जात आहे. हजारो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी असल्याने, देशभरातील कृषी कंपन्यांनी स्टॉल बुकिंगसाठी मोठी गर्दी केली आहे. आता केवळ मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले असून, इच्छुकांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आणि स्टॉल बुकिंगसाठी संपर्क
बाळासाहेब : 9850556009
सांगली (प्रशांत) : 8805007148
सातारा (मिलिंद) : 9011511611
पुणे (चंदन) : 9881256084
नाशिक (बाळासाहेब वाजे) : 9373911060
बेळगाव (विनायक) : 9448994050
अहिल्यानगर (राहुल) : 9921360535
सोलापूर (सर्जेराव) : 8668522600
छ. संभाजीनगर (आप्पासाहेब) : 8888604905.
शेतकऱ्यांना काय मिळणार...
हमखास गिफ्ट प्रदर्शनात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला 1500 रुपयांचे हमखास गिफ्ट देण्यात येणार आहे.
माती, पाण्याचे नमुने घेऊन यावेत
ऑर्बिट क्रॉप न्युट्रिएंटकडून प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत माती आणि पाणी परीक्षण करून देण्यात येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी येताना माती आणि पाण्याचे नमुने घेऊन यायचे आहे.

