

सांगली : दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचा निकाल आधीच लागलेला. आता प्रत्येक विद्यार्थी आणि त्याच्या पालकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे, आता पुढे काय? कोणता कोर्स? कोणतं क्षेत्र? कुठल्या संस्थेत प्रवेश? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि मार्गदर्शन घेऊन येत आहे, ‘दै. पुढारी एज्यु. दिशा’ हे बहुप्रतीक्षित शैक्षणिक प्रदर्शन.
6 ते 8 जूनदरम्यान सांगलीत हे प्रदर्शन भरवण्यात येत असून तुमच्या पाल्याच्या भविष्याचा मार्ग या प्रदर्शनातून आणि इथे होणार्या मार्गदर्शनातून निश्चित होणार आहे.सांगली आणि सातारा येथील शैक्षणिक प्रदर्शनास संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक आहेत, तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे हे लाभले आहेत. एम. आय. टी. - विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आणि भारती विद्यापीठ, पुणे हे प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक असून पीसीईटीज् पिंपरी - चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे, सूर्यादत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे, एम. आय. टी.- ए. डी. टी. युनिव्हर्सिटी पुणे, तसेच चाटे शिक्षण समूह हे सहप्रायोजक आहेत. सांगली येथील प्रदर्शनासाठी डेक्कन इन्स्टिट्यूट, सांगली हे सहप्रायोजक आहेत.
या प्रदर्शनात राज्यभरातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. करिअर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आणि नवे करिअरचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांची गोंधळलेली अवस्था दूर व्हावी आणि पालकांना निश्चितता लाभावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
‘पुढारी एज्यु. दिशा’ प्रदर्शनात वैद्यकीय (चइइड, इअचड, इकचड, इऊड तसेच इतर संलग्न), इंजिनिअरिंग (अख, रोबोटिक्स, सिव्हिल, डिप्लोमा तसेच इतर संलग्न), व्यवस्थापन (ऊइअ, इइअ, चइअ), अर्थ आणि वाणिज्यविषयक (उअ, उड, इ.उेा), प्रशासकीय सेवा (णझडउ, चझडउ), खढ (चउअ, इउअ, सायबर सिक्युरिटी), क्रिएटिव्ह (डिझाईन, अॅनिमेशन, मास कम्युनिकेशन, पत्रकारिता), संशोधन ( इ.डल., च.डल., अॅग्रीटेक) देशसेवा आणि परदेशी शिक्षण... अशा अनेकविध क्षेत्रातील तसेच नवतंत्रज्ञानाच्या अनेक करिअरविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.
नामांकित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित.
पालक आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संवादाची संधी.
कोर्स निवड, अॅडमिशन प्रक्रिया, स्कॉलरशिप यावर थेट मार्गदर्शन.
विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष समुपदेशन.
योग्य करिअर निवडीत निर्णायक ठरणारी मार्गदर्शनपर व्याख्याने.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन त्या क्षेत्रातील अनुभवी व्याख्यात्यांकडून.
मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार कोर्स निवडीचा सल्ला.