Food Commodity Market : खाद्यतेलाचे दर उतरले; शाळू ज्वारी, साखर तेजीतच

खाद्यतेलाचे दर आता १७८ रुपयावरून १६८ रुपये किलो
Food Commodity Market
Food Commodity MarketPudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : या सप्ताहात खाद्यतेलाचे दर प्रति किलो पुन्हा ४ रुपयांनी उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. खाद्यतेल आता १७२ रुपयावरून १६८ रुपये किलो झाले आहे. शाळू ज्वारी, गहू, साखरेचे दर तेजीतच आहेत. हरभरा डाळीचे दर पाच रुपयांनी वाढले आहेत. इतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत.

गेले तीन महिने तेजीत असणारे खाद्यतेलाचे दर आता १७८ रुपयावरून १६८ रुपये किलो झाले आहेत. शाळू ज्वारी १०० रुपये किलो आहे. ज्वारीचा क्विंटलचा दर ७ हजार ५०० वरून ८ हजार ३०० रुपये झाला आहे. साखरेचा दर पुन्हा वाढला असून, साखर आता ५८ रुपयावरून ६० रुपये किलो झाली आहे. सर्वसाधारण तांदळाचे दर आता ८० ते ९० रुपये किलो झाले आहेत. हरभरा डाळ १०५ ते ११० रुपये किलो आहे. तूरडाळ १६० वरून १८० रुपये, तर मूगडाळ १३० वरून १४० रुपये किलो झाली आहे. उडीदडाळ १४० रुपयांवरून आता १६० रुपये किलो झाली आहे. गूळ ६० ते ६५ रुपये किलो आहे. खाद्यतेलामध्ये सरकी तेल १८० ते १८५ रुपये, सोयाबीन १७५ ते १८०, तर शेंगतेल २१० रुपये किलो आहे.

रवा, मैद्याचा दर आता ५० रुपयावरून ५५ रुपये किलो झाला आहेत. गव्हाचा दर पाच रुपयांनी वाढला असून, दर आता ४८ ते ५० रुपये किलो आहे. साबुदाण्याचा दर ८६ रुपये आहे. मटकीचा दर २२० रुपये किलो झाला आहे. वरीचे तांदूळ २०० रुपये किलो झाले आहेत. खोबरे ३६० ते ३८० रुपये किलो आहे. शेंगदाण्याचा दर १५० रुपये किलो आहे. हायब्रीड ज्वारी ४५ ते ५०, मसूरडाळ ८० रुपये किलो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.