Dowry harassment: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू, नणंदेवर गुन्हा

दुकान गाळा खरेदी करण्यासाठी 13 लाख रुपये आणि सोन्याच्या अंगठीची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या नातेवाईकांनी छळ करीत हुंड्यासाठी धमकावले
Harassment Case
Harassment CasePudhari
Published on
Updated on

सांगली : दुकान गाळा खरेदी करण्यासाठी 13 लाख रुपये आणि सोन्याच्या अंगठीची मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या नातेवाईकांनी छळ करीत हुंड्यासाठी धमकावल्याची तक्रार 40 वर्षीय विवाहितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पती प्रवीण ऊर्फ सचिन पांडुरंग खराडे, सासू आशाताई पांडुरंग खराडे आणि नणंद दीपश्री पांडुरंग खराडे (सर्व रा. कोल्हापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली येथील शिल्पा यांचा विवाह 2025 मध्ये प्रवीण खराडे याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती प्रवीण याने, ‌‘आमच्या घराण्याला शोभेल असे कपडे आणि दागिने घालून ये‌’, असे म्हणून त्यांना हिणवण्यास सुरुवात केली. शिल्पा यांच्या वडिलांनी सव्वा तोळ्याचा नेकलेस आणि 27 हजार रुपये रोख दिले होते.

ऑक्टोबर 2025 मध्ये पती प्रवीण याने दुकान गाळा खरेदी करण्यासाठी माहेरहून 13 लाख रुपये आणि स्वतःसाठी 1 तोळ्याची सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली. त्यांनी असमर्थता दर्शविली असता, पतीसह सासू, नणंदेने शिल्पा यांना शिविगाळ करत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news