माझ्या नादाला लागू नका

आ. नायकवडी यांचा इशारा : संजय राऊत यांचा आरोप अल्पसंख्याक द्वेषातून
Sangli News
मिरज : येथे गुरुवारी पत्रकार बैठकीत बोलताना आ. इद्रिस नायकवडी.vPudhari Photo
Published on
Updated on

मिरज : पुढारी वृत्तसेवा

अल्पसंख्याक समाजाबद्दल उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भावना द्वेषाची आहे. कोणावरही केलेले आरोप ते आजपर्यंत सिद्ध करू शकलेले नाहीत. ते मुंबईत बसून नुसती बडबड करण्याचे काम करतात. त्यांनी कागदपत्रांच्याआधारे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान राष्ट्रवादीचे राज्यपालनियुक्त आमदार इद्रिस नायकवडी यांनी गुरुवारी दिले. ‘माझ्या नादाला लागू नका, मी तुम्हाला परवडणारा नाही’, असेही त्यांनी सुनावले.

Sangli News
देसाई – अडकूरकर व नायकवडी विवाह संपन्‍न

सांगली - मिरज - कुपवाड महानगरपालिकेत सत्तेत असताना इद्रिस नायकवडी यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला होता, असे विधान राऊत यांनी केले आहे. नायकवडी यांच्या नियुक्तीनंतर ‘वंदे मातरम्’ला विरोध करणार्‍याला आमदार केले, असा टोला त्यांनी लगावला. त्यास नायकवडी यांनी प्रत्युत्तर दिले. नायकवडी म्हणाले, राज्यातील सातजणांची राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. मात्र राऊत यांना इद्रिस नायकवडीच का खुपत आहेत? विधानपरिषदेत मी एकमेव मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे राऊत यांना मी खुपतो.

ते म्हणाले, मी ‘वंदे मातरम्’ला कधीही विरोध केला नाही. ‘वंदे मातरम्’बद्दल मला आदरच आहे. मिरजेत एका धार्मिक कार्यालयावरील हल्ल्यात संबंध नसतानाही मला गुंतवले होते. यातून न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. संजय राऊत काय कोर्टाचे बाप आहेत का? ते म्हणाले, इद्रिस नायकवडी काय आहे हे मिरजेत येऊन येथील जनतेला विचारा. तेच तुम्हाला सांगतील. मी काय आहे, हे संजय राऊत यांना माहीत नाही. इतरांच्या लागा, पण माझ्या नादाला लागू नका. मी त्यांना परवडणार नाही. येथून पुढे माझ्याकडे बोट दाखवायचे नाही, नजर वर करूनही पाहायचेही नाही. नाही तर इद्रिस नायकवडी काय आहे तुम्हाला दाखवून देईन.

Sangli News
सांगली : नगरसेवक अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात अजितदादांसोबत

नीतेश राणे यांना वेळोवेळी प्रत्युत्तर : नायकवडी

महायुतीचे घटक असणारे भाजपाचे नीतेश राणे वारंवार मुस्लिमविरोधी बोलतात. त्यांना वेळोवेळी आम्ही उत्तरदेखील दिलेले आहे. इथून पुढे अशी वक्तव्ये होऊ नयेत, यासाठी आम्ही महायुतीचा घटकपक्ष म्हणून प्रयत्न करू, असेही नायकवडी यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news