Devendra Fadnavis : महामंडळांच्या योजनांतून ‌‘लाडक्या बहिणीं‌’ना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य

- मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis(Pudhari Photo)
Published on
Updated on

मुंबई : महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य देऊन अधिक सक्षम केले जाणार आहे. यासाठी विविध महामंडळांच्या अंतर्गत चालणाऱ्या सर्व योजनांचा लाडकी बहीण योजनेशी समन्वय (कन्व्हर्जन) करून महिलांना क्रेडिटच्या माध्यमातून व्यवसायासाठी अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येईल. यासाठी सर्व महामंडळांना सूचना दिल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देतो. या रकमेचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी या रकमा क्रेडिटशी जोडल्या आणि महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्य दिले, तर त्या स्वावलंबी बनू शकतात. याच विचारातून आम्ही पहिला प्रयोग राबवला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news