

सांगली : लग्नात मानपान केला नाही म्हणून, तसेच फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून दहा लाख रुपये आण, असे म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रचना विशाल सुकते (सध्या रा. मिरज) या विवाहितेने संजयनगर पोलिसांत पती, सासू व सासरा या तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुझ्या आई-वडिलांनी लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, फ्लॅटसाठी दहा लाख रुपये दिले नाहीत, असे म्हणून सासरच्या मंडळींनी तिचा जाचहाट केला. शिवीगाळ करून धमकी देऊन छळ केला. हा प्रकार 14 मे 2022 पासून मार्च 2023 पर्यंत सुरू होता. याप्रकरणी विवाहितेने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित पती विशाल विजय सुकते, सासू जयश्री आणि सासरा विजय विश्वास सुकते आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास संजयनगर पोलिस करीत आहेत.