LPG delivery: नोंदणीनंतर 48 तासात गॅस घरपोहोच करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना
LPG delivery
LPG delivery: नोंदणीनंतर 48 तासात गॅस घरपोहोच कराPudhari
Published on
Updated on

सांगली : गॅसच्या नोंदणीनंतर 48 तासात नागरिकांना घरपोहोच सिलिंडर देण्यात यावा, ग्राहकांनी एजन्सीपुढे गर्दी करू नये, अशा सूचना जिल्हा पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिल्या. सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस एजन्सी चालकांची बैठक घेण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळुंके, अन्नधान्य वितरण अधिकारी राजू कदम उपस्थित होते.

बैठकीमध्ये सर्व गॅस वितरकांनी ओटीपी प्रणालीद्वारे घरपोहोच गॅस सिलिंडरचे वितरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या. सध्या जिल्ह्यात पुरेसा एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 2128 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 208 टन आणि आयओसीएल कंपनीचा 44 टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 1096.3 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news