Vishal Patil: विशाल पाटील यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पंतप्रधानांच्या निवासाकडे कूच करणाऱ्या खासदारांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले
Vishal Patil: विशाल पाटील यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
Published on
Updated on

सांगली : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पंतप्रधानांच्या निवासाकडे कूच करणाऱ्या खासदारांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना मंदीर मार्ग पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. खा. प्रियांका गांधी यांनाही याच पोलिस ठाण्यात ठेवले गेले आहे.

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासापासून खासदारांनी मोर्चाला सुरुवात केली. पंतप्रधानांच्या निवासाकडे निघालेल्या या मोर्चात खासदार विशाल पाटील हे प्रियांका गांधी यांच्यासोबत सहभागी झाले होते. त्यांना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या बंगल्यासमोर रोखण्यात आले. ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली.

या बाबत दूरध्वनीवरून माहिती देताना खासदार पाटील म्हणाले, आंदोलनाबाबत सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत असून या दडपशाहीला काँग्रेस कधीच भीक घालणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news