

कोकरूड : करुंगली-आरळा (ता. शिराळा) येथील डालमिया भारत शुगर (युनिट : निनाईदेवी) कारखान्याने गत हंगामातील उसाला प्रतिटन 147 रुपयांचा दुसरा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी सांगितले.
कुंभार म्हणाले, कारखान्याने 3200 रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच शेतकर्यांना दिला आहे. त्यामध्ये आता 147 रुपयांचा दुसरा हप्ता दिला आहे. आजअखेर एकूण कारखान्याने 3347 रुपये रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. शेतकरी बांधवांनी येणार्या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस शेतकर्यांनी डालमिया कारखान्यास देऊन सहकार्य करावे. यावेळी उपसरव्यवस्थापक सुधीर पाटील, एच.आर. हेड महेश कवचाळे उपस्थित होते.