दै. पुढारीच्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची प्रतीक्षा

इस्लामपुरात 7 फेब्रुवारीपासून दै. पुढारी - प्रतिराज युथ फौंडेशनचे आयोजन
Daily Pudhari Shopping and Food Festival
दै. पुढारीच्या शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल
Published on
Updated on

इस्लामपूर : इस्लामपूरसह परिसरातील नागरिकांसाठी खरेदी, खाद्य, मनोरंजनाचा उत्सव असलेला दै. पुढारी आणि प्रतिराज युथ फौंडेशनच्यावतीने आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल यावर्षीही दि. 7 ते 11 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. जयंत पाटील खुले नाट्यगृह येथे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. चितळे श्रीखंड, प्राजक्ता ब्युटीपार्लर हे सहप्रायोजक आहेत.

अनेक आकर्षक स्टॉल्स, चविष्ट खाद्यपदार्थ, मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम यामुळे हा फेस्टिव्हल अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्समध्ये चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम डेकोर, गारमेंट्स, फर्निचर, सौंदर्यप्रसाधने, किचन ट्रॉली, मसाले, लोणची, दागिने, बॅग्ज आणि प्लास्टिक वस्तूंची विस्तृत श्रेणी उपलब्ध असणार आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दालन आहे. या फेस्टिव्हलमध्ये झणझणीत कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मटण व चिकन दमबिर्याणीचा आस्वाद घेता येणार आहे. मासे, चिकन, मटण यांच्या चविष्ट डिशेस, चौपाटीचे प्रसिद्ध पदार्थ, साऊथ इंडियन डिशेस, बर्गर, सँडविच आदी फास्टफूड आणि अशाच वैविध्यपूर्ण स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी हौशी खवय्यांना मिळणार आहे. फेस्टिव्हलदरम्यान दररोज सायंकाळी कराओके, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, डीजे नाईट अशा कार्यक्रमांनी रंगत वाढणार आहे.

शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलमध्ये...

फेस्टिव्हलमध्ये पहिल्या दिवशी व्हॉईस ऑफ इस्लामपूर, दुसर्‍या दिवशी कथ्थक, बॉलिवूड डान्स, तिसर्‍या दिवशी फॅशन शो व कलाविश्व अकॅडमीच्या कलाकारांचा डान्स असणार आहे. चौथ्या दिवशी दिल से हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. पाचव्या दिवशी मुक्ताविष्कार हा लहान मुलांचा कार्यक्रम होणार आहे.

महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ?

दै. पुढारी कस्तुरी क्लब महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ बनले आहे. फॅशन शोमध्ये ज्या महिलांना सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी 8308706122 यावर संपर्क साधून नावनोंदणी करावी.

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क...

मधू- 8308706122

सनी- 9922930180

प्रणव- 9404077990

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news