Sangli News: नगरसेविका हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावर

आयुक्तांकडे तक्रार : स्वच्छतेबाबत हलगर्जीपणावर ठेवले बोट
Sangli News
Sangli News: नगरसेविका हजेरी केंद्रावर; आठच कर्मचारी कामावरPudhari
Published on
Updated on

सांगली : येथील प्रभाग 16 च्या नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे मंगळवारी सकाळी 6 वाजता स्वच्छता कर्मचारी हजेरी केंद्रावर पोहोचल्या. साडेसहा वाजेपर्यंत केवळ आठच कर्मचारी उपस्थित होते. नगरसेविका शिंदे यांनी परिसर स्वच्छतेमधील हलगर्जीपणावर बोट ठेवत आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.

नगरसेविका शिंदे म्हणाल्या, प्रभागात नियमित स्वच्छता होत नसल्याबाबत नागरिकांमधून तक्रारी येत होत्या. त्यामुळे सकाळी सहा वाजता स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरी ठिकाणी अचानक पाहणी केली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये दोन हजेरी केंद्रे आहेत. हिराबाग कॉर्नर येथील हजेरी केंद्रावर केवळ एकच स्वच्छता कर्मचारी आले होते, तर चोपडे हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या हजेरी केंद्रावर सात कर्मचारी साडेसहा वाजेपर्यंत हजर होते. प्रत्यक्षात या प्रभागात 50 हून अधिक स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. पाहणीवेळी स्वच्छता निरीक्षक अनुपस्थित होते. दोनपैकी प्रवीण चव्हाण हे एकमेव मुकादम उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 16 हा शहरातील मध्यवर्ती प्रभाग असून येथे 40 हून अधिक गल्ल्या, मुख्य रस्ते, फुटपाथ, चौक, बाजारपेठा, मच्छी व मटण मार्केट, शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, एमएसईबी कार्यालय, उद्याने अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे नगरसेविका शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छता कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची हजेरी व्यवस्थित होण्यासाठी बायोमेट्रिक फेस रीडिंग व मोबाईल ट्रॅकिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना ‌‘कारणे दाखवा‌’ नोटीस द्यावी. महापालिकेकडून दिलेल्या मास्क, हॅन्ड ग्लोव्हज्‌‍, जॅकेट, गमबूट आदी साधनांचा नियमित वापर बंधनकारक करावा. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नागरिकांशी वर्तणूक सुधारण्याची गरज आहे. प्रभागाचे काही भागांमध्ये विभाजन करून प्रत्येक भागासाठी ठराविक कर्मचारी नेमावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news