सांगली : या सप्ताहात खाद्यतेलाचे दर उतारल्याने दिवाळीची खरेदी करणार्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इतर किराणा मालाचे दर मात्र स्थिर आहेत. नारळ, खोबरे व खोबरेल यांचे दर मात्र अद्याप तेजीतच आहेत.
या साताहात खाद्यतेलाचे दर प्रति तीन रुपयांनी उतरले आहेत. खाद्यतेलाचे दर आता 152 ते 154 रुपये किलो झाले आहेत. शेंगदाण्याचा दर 125 रुपये किलो झाला आहे. खोबरे 330 रुपये किलो, तर खोबरेलचा दर 480 रुपये किलो आहे. नारळ 40 से 45 रुपये नग आहे. हरभराडाळ किरकोळ विक्रीचा दर 85 रुपये किलो आहे. सूर्यफूल, सरकी तेलाचा दर 150 ते 154 रुपये किलो आहे. शेंगतेलाचा किरकोळ विक्रीचा दर 162 ते 168 रुपये आहे. रवा आणि मैदा 40 ते 72, सर्वसाधारण तांदळाचा दर प्रतिकिलो 40 ते 60 रुपये किलो आहे. गहू 3 हजार 400 ते 3 हजार 600 रुपये क्विंटल असून, शाळू ज्वारी 40 ते 50, हायब्रीड 50 ते 42, गूळ 50 ते 55 रुपये किलो आहे. मूगडाळ 90 ते 100 रुपये किलो आहे.

