

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने राजकारण, समाजकारण करत आहेत. सर्व घटकांचा विकास साधत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण याला मोठे महत्त्व आहे. पुतळा लोकार्पण सोहळ्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी भक्तांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोमवार, दि. 15 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. यावेळी भाजप नेत्या जयश्री पाटील, नीता केळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर, उपाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्षा रोहिणी पाटील, सचिव दत्तात्रय ठोंबरे तसेच माजी महापौर कांचन कांबळे, अतुल माने, मनोज सरगर, सचिन सरगर, संजय कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती देशभर विविध उपक्रमांनी साजरी झाली. अहिल्यादेवी यांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध कार्यक्रम राबवले. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यादेवी यांच्या विचाराने राजकारण, समाजकारण करत आहेत. सर्व घटकांचा विकास साधत आहेत. सांगली महापालिकेनेही अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.
यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जयश्री पाटील, पुतळा लोकार्पण समितीचे अध्यक्ष मनगू सरगर, संतोष पाटील, रोहिणी पाटील, दत्तात्रय ठोंबरे यांच्यासह महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी प्रयत्न केले. अहिल्यादेवी यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. त्याचे लोकार्पण सोमवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. या सोहळ्याला अहिल्यादेवी भक्तांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे.