मुख्यमंत्री आज सांगली दौर्‍यावर

पोलिस मुख्यालयाचे लोकार्पण; कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन
Chief Minister Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसFile Photo
Published on
Updated on

सांगली ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शुक्रवारी (दि. 23) सांगली दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते पोलिस मुख्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण, तसेच भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस प्रथमच सांगली दौर्‍यावर येत आहेत. दुपारी एक वाजता ते इचलकरंजी येथून मोटारीने सांगलीला येणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिस मुख्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, तसेच 224 सदनिकांच्या इमारतीचे भूमिपूजन व इतर उपक्रमांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, आयुक्त सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, खासदार विशाल पाटील, खा. धैर्यशील माने, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आ. इद्रिस नायकवडी, आ. सुधीर गाडगीळ, आ. जयंत पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुहास बाबर, आ. विश्वजित कदम, आ. सुरेश खाडे, आ. सत्यजित देशमुख, आ. अरुण लाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

दुपारी दोन वाजता जिल्हा पोलिस दलाची आढावा बैठक होईल. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी नियोजन केले आहे. पोलिस अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक खोखर यांनी तयारीचा आढावा घेतला. बैठकीनंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर रस्त्यावरील नक्षत्र हॉल येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा होणार आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्र्यांसह भाजपचे शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news