

सांगली : या सप्ताहात गवारीचा दर 160 ते 170 रुपये किलोवर पोहोचला. वांग्याचा दर 100 ते 120 रुपये किलो झाला आहे. फ्लॉवर, गाजर यांचेही दर या सप्ताहात तेजीत राहिले.
गेल्या दोन महिन्यांपासून गवारीचे दर तेजीत आहेत. काल बाजारात देशी गवारीचे दर 160 ते 170 रुपये किलो झाले होते. वांग्याच्या दरात 20 रुपयांनी वाढ होऊन वांग्याची विक्री 100 ते 120 रुपये किलोने झाली. पालेभाज्यांची आवक वाढली असून, दर स्थिर आहेत. कोथिंबीर 8 ते 10 रुपये पेंढी असून, शेपू, चाकवत, करडई, तांदळ आदी पालेभाज्या 10 ते 12 रुपये, तर मेथी, कांदापात, पालेभाज्या 15 रुपये पेंढी आहेत.
हरभरा भाजी 40 ते 50 रुपये पाव किलो आहे. टोमॅटोचा दर 40 रुपये किलो आहे. दोडका 60 ते 70 रुपये किलो आहे. भेंडी 80 ते 100, ढबू मिरची 50 ते 60, कांदा 30 ते 35, बटाटा 30 ते 35, लसूण 80 ते 100, आले 60, कोबी गड्डा 30 ते 40 , फ्लॉवर गड्डा 30 ते 40, पडवळ 70 ते 80 रुपये किलो, कारली 50 ते 60 रुपये किलो, देशी काकडी 60 ते 70 रुपये किलो, वाटाणा 80 ते 100 रुपये किलो, बंदरी गवारी 100 ते 120 रुपये किलो, शेवगा 25 ते 30 रुपये चार नग, लिंबू 10 रुपयांना दोन ते तीन नग, दुधी भोपळा 10 रुपये नग, लाल भोपळा 80 रुपये किलो, घेवडा 60, रताळी 40 रुपये किलो.
नारळ, शेंगदाणे तेजीतच; खोबरे, तूरडाळ महागली
या सप्ताहात खोबरे, तूरडाळीच्या दरात वाढ झाली आहे. नारळाचे, शेंगदाण्याचे दर तेजीतच आहेत. खोबऱ्याच्या दरात दहा रुपयांनी, तर तूरडाळीच्या दरात पाच रुपयांनी प्रति किलोस वाढ झाली आहे. इतर किराणा मालाचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.
तूरडाळीचा किरकोळ दर 120 रुपये किलो होता, तो आता 125 रुपये झाला आहे. खोबऱ्याचा दर 320 रुपये किलो होता, तो आता 330 रुपये झाला आहे. शेंगदाणे 140 रुपये किलो आहेत. नारळाचे दर तेजीतच आहेत. नारळ प्रति नग 35 ते 40 रुपये आहे. गेल्या चार दिवसापासून लहान नारळ बाजारात आले असून, त्याचे दर प्रति नग 25 ते 30 रुपये आहे. शाळू ज्वारी 4 हजार ते 4 हजार 600 रुपये क्विंटल आहे. तांदूळ आता 4,500 ते 4800 रुपये क्विंटल झाला आहे. खाद्यतेलाचे दर महिन्यापासून स्थिर आहेत. खाद्यतेल 148 ते 152 रुपये किलो आहे. गहू 3 हजार 700 ते 3 हजार 800 रुपये आहे. मसूरडाळ 75 ते 80 रुपये किलो झाली आहे.
सूर्यफूल तेलाचा दर 155 रुपये झाला आहे. शेंगतेलाचा किरकोळ विक्रीचा दर 164 आहे. सरकी तेल डब्याचा दर (15 किलो) 2 हजार 300 रुपये आहे. अधिक मागणी असलेल्या तांदळाचा दर प्रति किलो 40 ते 70 रुपये आहे. शाळू ज्वारी 50 ते 52, हायब्रीड 40 ते 42, गूळ 50 ते 55, रवा 50, तर मैदा 48 ते 50, मूग 120 रुपये किलो आहे.