सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहीम

दीड टन कचरा संकलित : वातेवाईक, कर्मचारी सहभागी
Cleanliness drive in Sangli Civil Hospital area
सांगली : सिव्हिल हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वच्छता दूत, नागरिक, कर्मचारी.Pudhari Photo

स्वच्छता अपनाओ, बिमारी भगोओ’ उपक्रमांतर्गत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दीड टन कचरा संकलित झाला. रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी, नागरिकांनी सहभाग घेतला.महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता दूत दीपक चव्हाण यांनी प्रत्येक शनिवारी विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम घेण्याचा संकल्प केला आहे. सिव्हिल हॉस्पिटल परिसरात राबवलेल्या अभियानात दीड टन कचरा, गवत तसेच प्लास्टिकच्या बाटल्या संकलित केल्या. हॉस्पिटल आवारात साचून राहिलेला पाण्याचा निचरा केला.

Cleanliness drive in Sangli Civil Hospital area
सांगली : मनपाच्या निदान केंद्राचे रिपोर्ट लवकरच मोबाईलवर

स्वच्छता मोहिमेत रुग्ण प्रतिनिधी म्हणून पलूस येथील योगिता गोंदील, सामाजिक कार्यकर्ते चेतक कांबळे, शवविच्छेदन विभागाचे कर्मचारी संजय व्होवाळे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक शेखर पाटणकर, आकाश सदामते, वनीता ठोकळे, महाराष्ट्र सुरक्षा बलचे मगदूम, जवान कोळेकर, संदेश फडतरे, संतोष आलदर, दत्तात्रय अलदर, दत्ता संकपाळ यांच्यासह पस्तीस जणांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेसाठी अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, वैद्यकीय अधीक्षक विकास देवकारे यांचे सहकार्य लाभले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news