Chandrakant Patil : मतभेद चार भिंतीच्या आत ठेवा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील : भाजप नगरसेवक, पदाधिकारी, नेत्यांना सूचना
Chandrakant Patil
Chandrakant Patil
Published on
Updated on

सांगली : आपसातील मतभेद चार भिंतीच्या आत ठेवा, ते बाहेर पोहोचू देऊ नका, जनतेच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्या, समन्वयाने काम करा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या शहर जिल्हा कोअर कमिटी तसेच महापालिका नगरसेवकांच्या बैठकीत दिल्या. महापालिका क्षेत्रासाठी मोठे प्रकल्प आणू, प्रलंबित कामे मार्गी लावू, निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

येथे भाजप शहर जिल्हा कोअर कमिटी व त्यानंतर भाजप नगरसेवकांची बैठक झाली. कोअर कमिटी बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जयश्री पाटील, दीपक शिंदे, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग तसेच महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, महापालिकेतील भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते संदीप आवटी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी कोअर कमिटी बैठकीनंतर भाजप नगरसेवकांची बैठक घेतली. भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील गटबाजी आणि महापौर-स्थायी सभापती यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जनतेने पक्षावर विश्वास ठेवून महापालिकेची सत्ता दिली आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे. चांगले निर्णय घ्यावेत आणि सत्तांतराचा चांगला फरक नागरिकांना दिसला पाहिजे. दरम्यान, महापौर आणि सभापती यांनी समन्वयाने एकत्र राहून काम केले पाहिजे, अशी भावना काही नगरसेवकांनी व्यक्त केली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मी ते पाहतो. वादाचा विषय नाही. घरातील मतभेद चार भिंतीच्या आतच ठेवा. ते शेजाऱ्यांना ऐकू येऊ नयेत, याची दक्षता घ्या. समन्वयाने काम करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news