Chandrakant Patil | जयंतराव ‘सर्वोदय’चे किती पैसे हवेत? : चंद्रकांत पाटील

आता आमची सत्ता आहे; योग्य, न्याय्य बाबी होतील
Chandrakant Patil |
सांगली : मारुती चौक येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशी चर्चा करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील. यावेळी पृथ्वीराज पवार, सम्राट महाडिक.Pudhari Photo
Published on
Updated on

सांगली : सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत देण्यासाठी जयंतरावांना किती पैसे पाहिजेत, त्यांनी सांगावेत. मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मारुती चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उघड आव्हान दिले.

भाजपच्या अकरा वर्षांच्या सत्ताकाळातील विविध विकास कामांच्या फलकांचे अनावरण रविवारी मारुती चौकात चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. त्याआधी त्यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन माजी आमदार संभाजी पवार यांना अभिवादन केले व आप्पांच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘हा खूप जुना तिढा आहे, जो आम्ही कायदेशीर मार्गाने सन 2014 ते 2019 या भाजपच्या सत्ताकाळात सोडवत आणला होता. कारखाना सभासदांच्या ताब्यात आलाच होता, त्यावर्षी गाळप परवानाही देण्यात येणार होता, मात्र तोवर महापूर आला. जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रांत पुन्हा फेरबदल केले. त्यानंतर कोरोना आला. आता आमची सत्ता आहे, योग्य आणि न्याय्य बाबी होतील. जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, त्यांनी सांगावे किती पैसे द्यायचे. मी ते द्यायला तयार आहे.’

कार्यालयातील आठवणी

चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पवार यांना, ‘आता कार्यालयाचं रूपडं बदला’, अशी गमतीशीर सूचना केली. संभाजीआप्पा याच ठिकाणी बसून चारवेळा आमदार झाले. आम्ही विद्यार्थीदशेत असताना आप्पा आणि रामचंद्र देशपांडे यांची भेट घेऊनच जायचो, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news