Chandrakant Patil| विरोधी गटातून लढणार असाल, तर आधी राजीनामा द्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील; जिल्हा बँकेच्या २१ जागांवर बिनधास्त अर्ज भरा
Chandrakant Patil
Chandrakant Patil
Published on: 
Updated on: 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने भूमिका आक्रमक केली आहे. इच्छुकांनी सर्व २१ जागांवर बिनधास्त अर्ज भरावेत; परंतु पक्षाचा अधिकृत आदेश आल्यानंतर ज्यांना माघार घेण्यास सांगितले जाईल, त्यांनी तत्काळ अर्ज मागे घ्यावेत. ज्यांना विरोधकांच्या सहकार्याने किंवा दुसऱ्या गटातून निवडणूक लढवायची आहे, त्यांनी आधी भाजपच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

सांगली जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची खलबते येथील एका मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, भगवान साळुंखे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे आदी उपस्थिते होते.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी पक्षांतर्गत शिस्तीवर भर दिला. पक्षाच्या बळावर पदे भोगायची आणि ऐन निवडणुकीत विरोधकांशी छुपी हातमिळवणी करायची, ही दुटप्पी भूमिका आता खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दांत पाटील यांनी विरोधकांच्या वळचणीला जाऊ पाहणाऱ्यांना सुनावले.

कडेगावचे संग्राम देशमुख यांनी, "निवडणुकीत पक्षाच्या पॅनेलसोबत असल्याचा आव आणायचा आणि आतून विरोधकांची रसद पुरवायची, हा गद्दारीचा प्रकार यंदा कोणत्याही स्थितीत थांबलाच पाहिजे," अशी आक्रमक भूमिका मांडली. राहुल महाडिक यांनी, गेल्या निवडणुकीत पक्षातीलच काही घटकांकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सत्यजित देशमुख यांनीही निवडणुकीच्या रणनीतीवर विचार मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news